Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम बहिणीचे अपहरण करून उरकले लग्न; रागातून भावानेच केला मेव्हण्याचा खून

बहिणीचे अपहरण करून उरकले लग्न; रागातून भावानेच केला मेव्हण्याचा खून

माटुंगा येथे २६ वर्षांच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे.

Related Story

- Advertisement -

माटुंगा येथे अक्रम युसूफ चौधरी या २६ वर्षांच्या तरुणाची त्याच्याच नातेवाईकाने मित्राच्या मदतीने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच इजाज इम्तियाज शेख याला शाहूनगर पोलिसांनी अटक केली आहे तर हत्येनंतर अमन सिकंदर शेख हा पळून गेला आहे, त्याचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी सांगितले. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजता माटुंगा येथील लेबर कॅम्प, गटार गल्ली, रत्नमहल टॉवरच्या मेन गेटजवळच घडली.

नेमके काय आहे प्रकरण?

याच परिसरात युसूफ चौधरी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा अक्रम हा मुलगा तर आरोपी अमन शेख हा त्यांचा जावई आहे. अमनची लना ही बहिण असून तिचे अक्रमसोबत प्रेमसंबंध होते, याच प्रेमसंबंधातून त्याने तिचे अपहरण केले होते. त्यानंतर या दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. त्याचा राग अमनच्या मनात होता. त्यातून त्याने इजाजच्या मदतीने अक्रमच्या हत्येची प्लॅन केला होता.

- Advertisement -

गुरुवारी रात्री दहा वाजता अक्रम हा त्याचा मित्र तुफैलसोबत बिजागरी आणण्यासाठी बाहेर गेला होता. तेथून तो घरी जात असताना रत्नमहल टॉवरच्या मेन जवळच अमन आणि एजाजने त्याला पकडले. त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात अक्रम हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावण आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी युसूफ चौधरी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून काही तासांत इजाज शेख याला अटक केली. अमन हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.


हेही वाचा –

- Advertisement -