घरताज्या घडामोडीपालघर, सफाळ्यात प्रवाशांचा रेल रोको; राजधानी एक तास रोखली

पालघर, सफाळ्यात प्रवाशांचा रेल रोको; राजधानी एक तास रोखली

Subscribe

डहाणू रेल्वे स्थानकावरुन सकाळी सुटणारी चर्चगेट लोकल येत्या ३ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णयामुळे पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी बुधवारी रेल रोको आंदोलन केले. यावेळी प्रवाशांनी १ तास मुंबईकडे जाणारी राजधानी रोखून धरली. डहाणू रेल्वे स्थानकावरुन सकाळी सुटणारी चर्चगेट लोकल येत्या ३ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी हे आंदोलन पुकारले.

कोरोनाच्या काळात मुंबईकडे अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी डहाणू रोड येथून सकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल पश्चिम रेल्वेने नवीन वेळापत्रकात रद्द केली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने या विषयावर निवेदन लोकप्रतिनिधींना दिले होते. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. शिवाय, काही दिवसांनी रेल्वे प्रशासनाने ठराविक वेळेत महिला प्रवाशांनाही प्रवास करण्यास मुभा दिली. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करत मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -