घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींकडून देशवासीयांच्या अपेक्षाभंग

पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांच्या अपेक्षाभंग

Subscribe

लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील युद्ध कायम ठेवावे लागेल. हळूहळू बाजारातील लगबग वाढत आहे. मात्र याच काळात देशात बेफिकीरी वाढत आहे. हल्लीच असे काही फोटो आणि व्हिडिओ दिसून आलेत. ज्यामध्ये लोक पुरेशी काळजी घेताना दिसत नाही आहेत. ही बाब योग्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी, संध्याकाळी सहा वाजता दूरदर्शनवरून देशाला संबोधित केले. पंतप्रधान नेमकी काय घोषणा करणार याची उत्सुकता देशवासियांमध्ये असताना मोदींनी देशवासियांचा अपेक्षाभंग केला. कोणतीही नवे पॅकेज जाहीर न करता केवळ आगामी काळात येणारे सण आणि कोरोनाचा संसर्ग यावरून देशवासियांना संदेश दिला.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत कोरोनाविरोधातील लढाईत देशाने मोठा टप्पा पार केला आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली आहे. काही बेजबाबदार लोक घरातून बाहेर जाताना मास्क घालत नाहीत. सोशल डिस्टंसिंग पाळत नाहीत. हात धुत नाहीत. असे करून ते स्वत:ला आणि आपल्या कुटुंबालाही धोक्यात घालतात. आता सणावाराचे दिवस आहेत. मात्र थोडीशी बेफिकीरी जीवन उध्वस्त करू शकते. तुम्ही तुमचे कुटुंबीय सुरक्षित, सुखी दिसावे, अशी माझी इच्छा आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्यानंतर अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही.

- Advertisement -

लस येत नाही तोवर आपल्याला करोनाशी युद्ध सुरुच ठेवायचे आहे. करोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरु आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. करोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र या सगळ्यात कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकतं. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनाविरोधातील लस अजून आलेली नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, असे आवाहन मोदींनी केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. मोदी म्हणाले की, कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ९० लाखांहून अधिक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १२ हजार क्वॉरंटाइन सेंटर उभारण्यात आली आहेत. देशात सध्या २० कोरोना चाचणी करणार्‍या लॅब आहेत. तसेच देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -