घरक्राइमसिलिंडर रिफिलिंगसाठी पठ्ठ्याने लढवली शक्कल, पोलिसांनी ठिकाण्यावर आणली अक्कल

सिलिंडर रिफिलिंगसाठी पठ्ठ्याने लढवली शक्कल, पोलिसांनी ठिकाण्यावर आणली अक्कल

Subscribe

LPGच्या मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान गॅस सिलिंडरमध्ये अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग करणार्‍या एका आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल पोलिसांनी अटक केली. लतिफ कादीर सेलोट असे या आरोपीचे नाव असून या कारवाईत पोलिसांनी दोन, चार, पाच, साडेचौदा आणि एकोणीस किलोचे LPGचे १५२ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. त्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लतिफ हा गोरेगाव येथील एम जी रोडवरील मोतीलाल नगरात राहतो, तो एलपीजीच्या मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस रिफिलिंग करुन त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने गोरेगाव येथील सिद्धार्थनगर, स्विपर वसाहतीत छापा टाकून लतिफ सेलोट याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी अडीच लाख रुपयांचे लहान-मोठे गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. अनधिकृतपणे तसेच धोकादायक गॅस रिफिलिंग करून लतिफ हा या गॅसची विक्री करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी गोरेगाव पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – गॅस सिलेंडर बुकींग करताच ३० ते ४० मिनिटात येईल घरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -