घरताज्या घडामोडीएक राजा बिनडोक तर दुसरा...प्रकाश आंबेडकर यांची टीका

एक राजा बिनडोक तर दुसरा…प्रकाश आंबेडकर यांची टीका

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील मराठा संघटनांनी १० ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर त्यांनी टीका केली आहे. एक राजा बिनडोक तर दुसर्‍यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच अधिक भर आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी सध्या उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती भूमिका मांडत आहेत. या दोघांनीच आंदोलनाचे नेतृत्व करावे, अशी काही लोकांची मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीला दोन्ही राजांच्या नेतृत्वाबाबत काय वाटते, असा प्रश्न आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर आंबेडकर यांनी परखड भूमिका मांडली. ‘दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, असे मी कुठेही ऐकलेले नाही. एक राजा तर बिनडोक आहे. त्यांना घटनाच माहीत नाही. आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर सगळ्यांचे आरक्षण रद्द करा, अशी भूमिका घेणार्‍या माणसाला भाजपने राज्यसभेतच कसे पाठवले हा प्रश्न पडतो,’ असा टोला आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांना हाणला. उदयनराजेंना बिनडोक म्हणून तुम्ही त्यांना थेट अंगावर घेत आहात, असे विचारले असता, ‘मी कोणालाही भ्यायलो नाही, भीत नाही,’ असे ते म्हणाले.

- Advertisement -

संभाजीराजेंबद्दलही त्यांनी मत मांडले. संभाजीराजेंनी आरक्षणाच्या मुद्यावर भूमिका घेतलीय; पण ते इतर गोष्टींवर अधिक भर देताहेत, असे दिसत असल्याचे आंबेडकर म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नांमुळे महाराष्ट्रातील सामंजस्य मला बिघडताना दिसत आहे. सरकार कुठलीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत थांबा, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, संघटना आक्रमक आहेत. त्यातून विविध संघटनांमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता दिसतेय. महाराष्ट्रातील सामंजस्य कुठेही बिघडू नये असे आम्हाला वाटते. आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडून भलत्याच गोष्टींवर चर्चा सुरू आहे. मुख्य मुद्दा केंद्रस्थानी आणण्यासाठीच हा बंद आहे. आम्ही आधीच आरक्षणाला पाठिंबा दिल्यामुळे बंदलाही आमचा पाठिंबा आहे,’ असे आंबेडकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -