घरताज्या घडामोडीडिसेंबरअखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट?

डिसेंबरअखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट?

Subscribe

कोरोना संसर्गाचे निमित्त करत केंद्राच्या सूचनांचे पालन करण्यात येत नसल्याच्या तसेच नुकत्याच पारीत करण्यात आलेल्या कृषी विधेयक फेटाळल्याच्या कारणास्तव राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार असल्याची शक्यता बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात अनलॉक 5 सुरू झाले असले तरी केंद्राच्या सूचनेप्रमाणे मंदिरे, लोकल सुरू न करण्याचा निर्णय घेत राज्य सरकार केंद्राच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहे. याशिवाय केंद्राने पारीत केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्याच्या भूमिकेचा परिणाम म्हणून केंद्र हे पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत असल्याचे आंबेडकर म्हणाले.

केंद्राने संमती देऊनही राज्यात मंदिरे उघडण्यात आलेली नाहीत. लोकल सुरू करण्याची सर्व स्तरातून मागणी होत असतानाही राज्य सरकारने त्यास नकार दिला आहे. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असली तरी केंद्राला ती पचणारी नाही. महाराष्ट्रातील सरकार हे भाजप विरोधातील सरकार असल्याने या सरकार विरोधात वातावरण निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपच्या समर्थकांनी आणि त्या पक्षाच्या नेत्यांनीही राज्यपालांची अनेकदा भेट घेऊन केली होती.

- Advertisement -

मात्र, याचा परिणाम बिहारच्या निवडणुकीवर होऊ नये, याकरता डिसेंबरअखेर हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्य घटनेनुसार केंद्राने घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्याला जाता येत नाही. मात्र आघाडी सरकारने मात्र केंद्राच्या भूमिकेचा कायम विरोध केला आहे. नुकत्याच पारीत झालेल्या कृषी विधेयकाला राज्याने ठाम विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने राष्ट्रपती राजवटीची तयारी चालवल्याचे आंबेडकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -