सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आणखी २ तर कोल्हापूरमध्येही १ रुग्ण पॉझिटिव्ह

Miraj
corona virus
प्रातिनिधिक छायाचित्र

सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर तालुक्यात एकाच कुटुंबात ९ लोक करोना बाधित झाले होते. त्यानंतर आता त्याच कुटुंबातील आणखी दोन लोकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता हा आकडा ११ वर पोहोचला आहे. तर याच कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या कोल्हापूरातील एका नातेवाईकाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

इस्लामपूरमधील ४ लोक हज यात्रेला जाऊन आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. हे चार लोक इस्लामपूर येथे एकत्र कुटुंबात राहत असून त्यांच्या कुटुंबात ३५ सदस्य आहेत. १९ मार्च रोजी यातील १८ जणांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

काल या कुटुंबातील आणखी पाच जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या ९ झाली होती. मात्र आज आणखी दोन महिलांना लागण झाल्याचे समोर आले आहे. तर पेठ वगडगाव या कोल्हापूर जिल्ह्यातील गावातील एक महिला देखील पॉझिटिव्ह आल्याचे सांगली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले आहे. सध्या सर्व रुग्णांवर मिरज येतील शासकीय रुग्णालयात विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. एकाच कुटुंबातील ११ जण पॉझिटिव्ह आल्यामुळे इस्लामपूर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here