घरताज्या घडामोडीमराठी माणसाचा अटकेपार झेंडा! श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी

मराठी माणसाचा अटकेपार झेंडा! श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी

Subscribe

सर्व भारतीयांसाठी विशेषत: महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कुलचे डीन म्हणून भारतीय वंशाच्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजी ते हा मानाचा पदभार स्वीकारतील. 112 वर्षे जुनी ही संस्था असून या संस्थेत दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा जगभरात ख्याती आहे. श्रीकांत दातार सलग दुसरे भारतीय वंशाचे डीन असणार आहेत.

श्रीकांत दातार हे मुंबई विद्यापीठ आणि अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे माजी विद्यार्थी आहेत. 1973 मध्ये दातार यांनी मुंबई विद्यापीठातून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते चार्टट अकाऊंटंट झाले. आयआयएम, अहमदाबादमधून त्यांनी पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा देखील पूर्ण केला. दातार यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली आहे.

- Advertisement -

दातार हे 1 जानेवारी रोजी हार्वर्ड स्कूलच्या डीनचा पदभार स्वीकारतील, अशी माहिती हार्वर्ड बिझनेस स्कुलचे अध्यक्ष लॅरी बॅकोव यांनी दिली. ‘दातार एक अभिनव शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक आहेत’, असे बॅकोव यांनी दातार यांचे वर्णन केले आहे.

दातार हे व्यवसाय शिक्षणाच्या भविष्याबद्दल अग्रक्रमाने विचार करणारे विचारवंत आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुळे उद्भवलेल्या आव्हानांना हार्वर्ड बिझनेसकडून मिळालेल्या सर्जनशील प्रतिसादात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हार्वर्डमध्ये जवळजवळ 25 वर्षे विविध पदांवर त्यांनी काम केले आहे, अशी माहिती बॅकोव यांनी दिली.

- Advertisement -

संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात हार्वर्ड बिझनेस स्कूलचे योगदान मोलाचे आहे. श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या इतिहासातील 11 वे डीन असणार आहेत. नितीन नोहरीया दहा वर्षांच्या सेवेनंतर डीनशिपच्या सेवेतून निवृत्त झाले असून त्यांच्या जागी दातार पदभार सांभाळतील.

आज मराठी असंख्य तरुण-तरुणी जेव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत. त्यावेळेस या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार. श्रीकांत दातार यांच्याविषयी वाचताना त्यांचा प्रवास थक्क करून गेला. या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या प्रथितयश विद्यार्थ्यांची नावे वाचताना महाराष्ट्रातील राहुल बजाज आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त फारशी नावे आढळली नाहीत. भविष्यात इथून उत्तीर्ण होऊन जगात मराठीचा झेंडा फडकवणारी अनेक नावे निघू देत ही मनापासून इच्छा. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. आज आपले अनेक मराठी तरुण-तरुणी कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्समध्ये काम करत आहेत. अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा. – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -