घरताज्या घडामोडीपालघर साधू हत्या प्रकरणातील ४७ आरोपींना जामीन मंजूर

पालघर साधू हत्या प्रकरणातील ४७ आरोपींना जामीन मंजूर

Subscribe

पालघर (Palghar) मधील गडचिंचले साधू हत्याकांड (Sadhu Hatyakand) प्रकरणातील ४७ आरोपींना जामीन मंजूर केला आहे. ठाणे कोर्टाने (Thane Court) या आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी ठाणे कोर्टाने ५३ लोकांचा जामीन मंजूर केला होता. दरम्यान पालघरमधील या साधू हत्याकांड प्रकरणी पोलिसांना एकूण १६३ लोकांना पकडले होते, ज्यामध्ये १२ आरोपींचे वय १८ पेक्षा कमी होते. तसेच मे महिन्यात या प्रकरणी एका एका ५५ वर्षांच्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले होते. त्यामुळे या आरोपीच्या संपर्कात आलेल्या ४३ जणांना आता क्वॉरंटाईन करण्यात आले होते.

१६ एप्रिल रोजी पालघरच्या सीमावर्ती भागामध्ये गुजरातकडे जाणाऱ्या दोघा साधूंची जमावाने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती. या भागामध्ये लहान मुलांना चोरणारी टोळी सक्रीय झाल्याची अफवा पसरली होती. हे दोघेजण चोरच आहेत, या संशयातून जमावाने त्यांच्यावर हल्ला करत मारहाण करायला सुरुवात केली. ही मारहाण इतकी निर्घृण होती, की त्यामध्ये या दोघा साधूंचा मृत्यू झाला. या घटनेच्या २४ तासांमध्ये पोलिसांना १६३ आरोपींना ताब्यात घेतले.

- Advertisement -

या पालघर साधू हत्याकांड प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. याप्रकरणी ४ हजार ९५५ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा – मृत कोरोना योद्धयांच्या वारसांना डॉक्टरकीची संधी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -