घरक्राइमबुटांवरून पटवण्यात आली हल्लेखोराची ओळख

बुटांवरून पटवण्यात आली हल्लेखोराची ओळख

Subscribe

काल्हेर येथे महिलेवर गोळीबार करून पळून गेलेल्या दोघांना मद्यप्रदेशातुन अटक, गुन्हे शाखेची कामगीरी

गुन्हा करताना गन्हेगार मागे काही ना काही पुरावा ठेवून जातो, तोच पुरावा गुन्हेगारापर्यंत पोलिसांना पोहचवतो, अशाच एका पुराव्याने ठाणे गुन्हे शाखेला आरोपीपर्यंत पोहचण्यास मदत केली आहे. भिवंडीतील काल्हेर येथे महिलेवर गोळीबार करून पळून गेलेल्या हल्लेखोरांची ओळख महिलेच्या घरात सोडून गेलेल्या बुटावरून पटली आणि पोलिसांनी या हल्लेखोराचा माग काढत मध्यप्रदेशातून दोघांना अटक केली आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या महिलेवर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हा हल्ला पैशांच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे.

जयश्री देढे (३७) असे गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या कुटुंबियांसह भिवंडी तालुक्यातील काल्हेर मधील दुर्गा पार्क येथील इमारतीत कुटुंबासह राहण्यास आहे. १२ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जयश्री देढे या गृहणी घरात एकट्याच असताना दोन अनोळखी इसम त्याच्या घरात घुसले आणि त्यांनी तिच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. कसले पैसे म्हणून जयश्री यांनी जाब विचारताच आणि आरडाओरड करताच हल्लेखोरापैकी एकाने या महिलेवर रिव्हॉवर मधून एका गोळी झाडून घराबाहेर दोघेही पडत असताना या महिलेच्या मुलाने दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने आणखी दोन गोळ्या झाडत तेथून पोबारा केला होता. हल्लेखोरांपैकी एकाचे बुट जयश्री देढेच्या घरातच राहिले होते.

- Advertisement -

जयश्री देढेच्या डोक्यात गोळी शिरल्याने तिला तात्काळ ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र त्या बोलण्याच्या परिस्थिती नसल्यामुळे हे हल्लेखोर कुठून आले होते? त्याच्यात काय बोलणे झाले? याबाबत पोलिसांना काहीही कळू शकले नाही. मात्र हल्लेखोर घरात सोडून गेलेले बूट मात्र पोलिसांना मिळून आले होते. ठाणे गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. महेंद्र जाधव यांनी हल्लेखोरांचे बूट ताब्यात घेऊन त्याचे छायाचित्र काढून या प्रकारचे बूट घालणाऱ्याचा शोध सुरू केला असता भिवंडीतील ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये त्याची माहिती घेण्यात आली असता तेथील काही ट्रक चालकांनी ते बूट ओळखून हे बूट सुरेंद्र प्रतापसिंग भाटी असल्याचे सांगितले. सुरेंद्र भाटी हा चालक असून मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात राहण्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्यामार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी सपोनि. महेंद्र जाधव याची पथक मध्यप्रदेश येथे पाठवले. या पथकाने आपली कामगिरी चोख बजावत सुरेंद्र भाटी आणि त्याचा सहकारी मानसिंग उर्फ बंटी चौहान या दोघांना ताब्यात घेऊन ठाणे येथे आणले. या दोघांकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्हयाची कबुली देत सुरेंद्र भाटी याने ते बूट माझेच असल्याची माहिती पोलिसांना दिली.

काय घडले त्या दिवशी?

सुरेंद्र भाटी हा ट्रक चालक असून मध्यप्रदेश येथून भिवंडी येथे माल घेऊन येत असतो, त्याची ओळख जयश्री देढे या महिलेच्या पतीसोबत झाली होती. जयश्रीच्या पतीचा भिवंडीत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. जयश्री देढे हिच्या पतीकडे भरपूर पैसे असून त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी त्याने योजना आखली. सुरेंद्रने जयश्रीच्या पतीकडून जयश्रीचा मोबाईल क्रमांक कुठ्ल्यान कुठल्या कारणावरून मिळवला होता. घटनेच्या आदल्या दिवशी त्याने जयश्रीच्या मोबाईलवर फोन करून ‘मुझे आपके बरे मी सब कूछ पता है, तुम्हारे पतीको बता दूंगा, नाही तो मुझे ५० हजार रुपये दो, असे बोलून तिच्याकडे पैशांची मागणी केली. तिने या फोनबाबत आपल्या मुलाला सांगितले आणि सुरेंद्रला घरी बोलावयाचे असे ठरवले. पैसा लेनेके लिये घर पे आज जाना असे सांगून जयश्रीने त्याला १२ जानेवारी घरी बोलावले. जयश्रीचा मुलगा देखील तयारीत बाहेर थांबला होता.

- Advertisement -

सुरेंद भाटी याने मानसिंग याला घेऊन जयश्रीच्या घरी आला. जयश्रीने त्याला बसण्यासाठी सांगितले आणि पिण्यासाठी दोघांना पाणी दिले. सुरेंद्र हा बुट काढून घरात येऊन बसला आणि त्याने जयश्रीकडे पैशाची मागणी करताच जयश्रीने मुलाला आवाज दिला आणि दोघांना पकड्ण्याचा प्रयत्न करताच सुरेंद्रने स्वतःजवळील गावठी कट्टा काढून जयश्रीवर गोळी झाडून घराबाहेर पडणार तेवढ्यात जयश्रीचा मुलगा आला आणि त्याने त्याला पकड्ण्याचा प्रयत्न करताच सुरेंद्रने त्याच्यावर दोन गोळी झाडल्या. सुदैवाने त्याला एकही गोळी लागली नाही. आरडाओरड होताच सुरेंद्र हा बूट सोडून पळून गेला होता.


हेही वाचा – बहिणीचे अपहरण करुन उरकले लग्न; रागातून भावानेच केला मेव्हण्याचा खून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -