Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ठाण्यात बर्ड फ्लूसाठी हेल्पलाईन

ठाण्यात बर्ड फ्लूसाठी हेल्पलाईन

मृत पक्षांची माहिती तात्काळ देण्याचे ठाणे महापौर आणि आयुक्तांचे आवाहन

Related Story

- Advertisement -

बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवू नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यांनी केले आहे.

देशात काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्ककतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. या साथीमुळे नागरिकांनी घाबरून न जाता मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे.

- Advertisement -

ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगरानीखाली हा नियंत्रण स्थापन केला असून नागरिकांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथील टोल फ्री नंबर -१८०० २२२ १०८ तसेच ०२२ -२५३७१०१० या हेल्पलाईनवर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – भिमाशंकरमध्ये भाविकांची अंधश्रद्धा उठतेय वृक्षांच्या जिवावर!


- Advertisement -

 

- Advertisement -