Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी माहीम, दादर, प्रभादेवी, लोअर परळमध्ये २,३ डिसेंबरला पाणी नाही

माहीम, दादर, प्रभादेवी, लोअर परळमध्ये २,३ डिसेंबरला पाणी नाही

Related Story

- Advertisement -

‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन १४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम येत्या २ व ३ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे.

सदर काम २ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होऊन ते ३ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

- Advertisement -

जी दक्षिण प्रभागातील ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, एलफिस्टन (लोअर परळ) या परिसरांमध्ये २ डिसेंबरला पाणीपुरवठा होणार नाही. तसेच जी उत्तर प्रभागातील एलफिस्टन (लोअर परळ), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्चिम) आणि दादर (पश्चिम) या भागातही २ डिसेंबरला पाणी येणार नाही.

जी दक्षिण प्रभागातील ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग
या परिसरांमध्ये ३ डिसेंबर रोजी सकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तर धोबी घाट, सातरस्ता या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

- Advertisement -