घरताज्या घडामोडीअडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून केली हत्या!

अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून केली हत्या!

Subscribe

कोरोनाच्या काळात देशात अनेक बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. राज्यात देखील अशा प्रकारच्या अनेक घटना घडला आहे. दरम्यान आता पेण तालुक्यात एका अडीच वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पेण तालुका हादरला आहे. या घटनेत सर्वात संतापजनक बाब म्हणजे जामिनावर सुटलेल्या एका नराधमाने हे दुष्कृत्य केले आहे. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

पेणकरांची आजची पहाट ही या वाईट घटनेने उजाडली. माहितीनुसार, पेण तालुक्यातील मळेघर वाडी येथील साबर सोसायटीमधील मोतीराम तलाव इथे आदिवासी वाडीत ही धक्कादायक घटना घडली आहे. एका अडीच वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पेण पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, पेण पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याला आधीही बलात्कारप्रकरणी अटक झाली होती. सध्या तो जामीनावर असून त्यानेच हे संतापजनक कृत्य केल्याचे समजते.


हेही वाचा – येत्या २४ तासात मुंबईसह ठाणे, रायगड, वसई-विरारमध्ये जोरदार पावसाचा अंदाज – IMD

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -