Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी विकृतीचा कळस! सापाच्या डोक्यात घातला वापरलेला कंडोम

विकृतीचा कळस! सापाच्या डोक्यात घातला वापरलेला कंडोम

Related Story

- Advertisement -

एका सापाला वापरलेल्या कंडोम घातल्याची विकृत घटना मुंबईत घडली आहे. या सापाला वाचवण्यासाठी सर्पमित्राला खूप प्रयत्न करावे लागले. कंडोममध्ये अडकल्यामुळे सापाला श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे तो अस्वस्थ होऊन तडफडत होता. अखेर महिला सर्पमित्र मिता मालणकर यांनी सापाचा जीव वाचवला. हे क्रूर कृत्य काही अज्ञान व्यक्तीने केले असून त्यांनी सापाच्या डोक्यात वापरलेला कंडोम घातला होता, असा संशय व्यक्त केला जात आहे.

नक्की काय घडले?

द टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, २ जानेवारी मुंबईतील कांदिवली भागात ग्रीन मीडोज हाउसिंग सोसायटीमध्ये सकाळी ८.३०च्या सुमारास साप तडफडत असताना दिसला होता. त्यानंतर सर्पमित्र मिता मालवणकर यांना एका रहिवाशी महिलेने सांगितले, ‘एक साप विचित्र पद्धतीने तडफडत असून त्यांच्या भोवती प्लास्टिक पिशवी गुंडाळली आहे.’ पण जेव्हा मिता मालवकर तिथे पोहोचल्या, तेव्हा त्यांना सापाला पाहून धक्काच बसला. कारण कोणीतरी वापरलेले घाणेरडे कंडोम सापाच्या तोंड्याभोवती गुंडालेले होते. त्यांनी सापाची सुखरुप यातून सुटका केली. सापाबाबतचे हे क्रूर कृत्य सर्प पकडण्यामध्ये प्रशिक्षित असलेल्या व्यक्ती केले असावे असा संशय मिता मालवणकर यांनी व्यक्त केला. सध्या या अज्ञान व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.


- Advertisement -

हेही वाचा – आता बर्ड फ्ल्यूचा होतोय फैलाव, ही लक्षणे दिसल्यास व्हा सावधान


 

- Advertisement -