लग्नाआधीच झाला मोठा राडा, व्हिडिओ कॉलवरच घेतला गळफास

West Bengal: 22-year-old woman commits suicide on video chat with fiancé after argument
लग्नाआधीच झाला मोठा राडा, व्हिडिओ कॉलवरच घेतला गळफास

लग्न म्हणजे दोन अनोळखी व्यक्तींनी कुटुंबाच्या आशीर्वादाने सात जन्म सोबत राहण्यासाठी देवाच्या साक्षीने घेतलेली वचन. परंतु एका नात्यात इतकी भांडणं झाली की, लग्न होण्यापूर्वीच मुलीने स्वतःचं जीवन संपवलं. ही घटना पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मुलगी नंदिता रॉय आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. पहिल्यांदा बोलणं सुरळीत सुरू होतं, पण नंतरला भांडणाला सुरुवात झाली. भांडणं इतकं कडाक्याचं झालं की, तिची अस्वस्था खूपच खराब झाली. त्यामुळे तिने व्हिडिओ कॉलवरच गळफास लावून घेतला आणि तिचा होणाऱ्या नवरा फक्त हे बघत राहिला.

पोलिसांच्या मते, मुलीचा होणार नवरा बाबू दास गंगारामपूर येथे राहणार होता. मुलीच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे की, बाबू दासने ही घटना घडल्यानंतर त्वरित माहिती दिली नाही. जेव्हा कुटुंबियांनी नंदिताला खूप वेळा आवाज दिला आणि त्यांना उत्तर मिळालं नाही. म्हणून ते दरवाजा तोडून आतमध्ये गेले तर तिथली परिस्थिती हैराण करणारी होती.

पीडित मुलीचे काका म्हणाले की, ‘दासने आम्हाला फोन नाही केला ही आश्चर्याची बाब आहे. त्याने याबाबत थेट पोलिसांना माहिती दिली. आम्ही भांडणाच्या वेळी हस्तक्षेप करून तिचा वाचवू शकलो असतो.’ दरम्यान मृत महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी दास विरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – गर्भवतीने ऑपरेशन दरम्यानच जीव सोडला, अंत्यसंस्कारानंतर अस्थीमध्ये कैची सापडल्याने खळबळ