घरताज्या घडामोडीराज्यातील कोचिंग क्लासेस २५ नोव्हेंबरपासून सुरू?

राज्यातील कोचिंग क्लासेस २५ नोव्हेंबरपासून सुरू?

Subscribe

कोचिंग क्लासेस संघटनेचा ठराव

येत्या २३ तारखेला शाळा सुरू झाल्यानंतर २५ तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस सुरू करण्यात येतील. क्लासेस सुरु झाल्यानंतर सरकारने कोणत्याही क्लासेसवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई, क्लासेस बंद करण्याच्या सूचना किंवा दंड आकारणी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोचिंग क्लासेसच्यावतीने महाराष्ट्रभर ‘जेल भरो’आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोचिंग क्लासेस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने दिला आहे.

अनलॉकमध्ये कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था वगळता दारूची दुकाने, बार, जिमखाने, ग्रंथालय, इतर सर्व गोष्टी सुरू झाल्या. परंतु शैक्षणिक क्षेत्राबद्दल शासनाकडे कोणतीही नीती, नियमावली व आराखडा नाही. मुळात सरकार याबाबतीत उदासीन असल्याचेच दिसते. त्यामुळे आज कोचिंग क्लासेस संघटनेची राज्य कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ठराव संमत करून क्लासेस सुरू करण्याचा इशारा देण्यात आला.

- Advertisement -

गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने क्लास संचालकाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, क्लास संचालकास मोठ्या आर्थिक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक क्षेत्राबद्दल शासनाकडे कोणतीही नीती नियमावली व आराखडा नाही. ज्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यासारख्या महामानवांनी जगाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्या महाराष्ट्रात शिक्षणाचे असे हाल होत असतील तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे ठरावात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच २३ नोव्हेंबरपासून ९वी ते १२ वर्ग सुरू करण्याचे शासनाने सांगितले. परंतु खासगी क्लासेसबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. संघटनेच्या आजच्या बैठकीत २५ तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस सुरु करणार असल्याचा ठराव करण्यात आला. तसेच, क्लासेस सुरु झाल्यानंतर जर कोणत्याही क्लासेसवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली तर महाराष्ट्रभर जेल भरो आंदोलन करण्याचा ठराव देखील सदर बैठकीत करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -