Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लहान मुलांसह लोकल प्रवासास महिलांना बंदी

लहान मुलांसह लोकल प्रवासास महिलांना बंदी

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची परवानगी दिली होती. मात्र, अनेक महिला आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करत असल्याचे वारंवार समोर आले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधून केवळ महिलांना प्रवासाची परवानगी दिलेली आहे. त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची परवानगी नाही, असे खडसावले आहे. लहान मुलांसह महिला प्रवास करताना दिसली तर तिला घरी पाठवण्यात येणार आहे.

मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रेल्वेने मिशन बिगिन अगेन अंतर्गत महिलांना लोकलमधून प्रवासाची मुभा दिली होती. मात्र, अनेक महिला या आपल्या लहान मुलांसोबत लोकलमधून प्रवास करतात, ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. त्यामुळे आता लहान मूल घेऊन प्रवास करणार्‍या महिलेला लोकल प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.

- Advertisement -

यानुसार मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या गेटवर एक आरसीएफ जवान तैनात करणार आहे. हा आरसीएफ जवान त्या महिलेची तपासणी करेल. जर त्या महिलेसोबत लहान मूल आढळून आले, तर त्या महिलेला प्रवासाची परवानगी मिळणार नाही. तिला रेल्वे स्थानकातून पुन्हा घरी पाठवले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबरपासून महिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली होती. महिलांना सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -