घरअर्थजगततो इन्कम टॅक्सचा मेसेज नाही सावधान! क्लिक करू नका

तो इन्कम टॅक्सचा मेसेज नाही सावधान! क्लिक करू नका

Subscribe

इन्कम टॅक्स विभागाने जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. इन्कम टॅक्स आयटी विभागाने येणार्‍या खोट्या मेसेजपासून सावध केले आहे. काही लोकांना इन्कम टॅक्स रिफंडसंदर्भात खोटे ईमेल आणि SMS येतात. ते खरे नाही आहे. म्हणूनच आयकर विभागाने जनतेला सावध केले आहे. मेसेजमध्ये लिहिले आहे की, असा मेसेज येतो ज्यात एक लिंक दिलेली असते. त्यावर क्लिक करून टॅक्स रिफंड मिळेल, असे लिहिलेले असते. Url https://151.80.90.62/ITRefund असेही दिलेले असते. पण चुकूनही त्यावर क्लिक करू नका.

एका करदात्याने हा SMS मिळाल्यानंतर आयकर विभागाशी संपर्क साधला आणि SMSला ट्विटर हँडलवर शेअर केले. त्याने विचारले की हा SMS बरोबर आहे का? त्यावर आयकर विभागाने सांगितले की त्यांनी असा कुठला मेसेज पाठवला नाही.

- Advertisement -

तुम्हाला खोटी लिंक असलेला मेसेज आला आणि त्यावर तुम्ही क्लिक केले तर तुम्ही अडचणीत याल. कारण लिंक उघडली की तुमच्याकडे युजरनेम, पासवर्ड आणि क्रेडिट कार्डाची माहिती मागितली जाईल. ती तुम्ही दिलीत तर मात्र मोठे नुकसान होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -