सेन्सेक्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांना ३.३० लाख कोटींचे नुकसान

share market
अनलॉक १.० चा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स १०५० अंकांनी वधारला

तब्बल २० दिवसांनंतर आज, गुरूवारी शेअर बाजारात मोठ्या घसरण झाली आहे. ४१ हजारांच्या दिशेने वाढणारा सेन्सेक्स ३९,७०० च्या पातळीवर आला आहे. निफ्टीदेखील ११,६६० च्या पातळीवर पोहोचला. तो जवळजवळ ३०० अंकांनी कोसळला. सेन्सेक्स १०६६ अंकांनी कोसळून ३९,७२८ वर, तर निफ्टी २९० अंकांची घसरण नोंदवत ११,६८० वर बंद झाला आहे.

ईटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांचे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहेत. लिस्टेड कंपन्यांचे बाजारातील भागभांडवल घटून १५७.२२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याचा मोठा तोटा बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि इंडसइंड बँक यांना झाला. त्यांच्या शेअर्समध्ये ४ टक्के आणि त्यापेक्षा जास्त टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून शेअर बाजारामध्ये सतत वाढ झाली होती. गेल्या तीन आठवड्यांत तो ४२०० अंकांच्या उच्चांकी स्तरानं वाढला आहे. २९ सप्टेंबरचा अपवाद वगळता सेन्सेक्स २५ सप्टेंबरपासून स्थिररीत्या बंद होत होता. २४ सप्टेंबरला सेन्सेक्स ३६,५५३ च्या पातळीवर बंद झाला.

हेही वाचा –

हिंदुत्ववादी असाल तर राज्यातले सर्व मदरसे बंद करुन दाखवा; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान