घरअर्थजगतएक्झिट पोलमुळे गडगडला 'शेअर बाजार'

एक्झिट पोलमुळे गडगडला ‘शेअर बाजार’

Subscribe

तेलंगणा, मिझोराम, राजस्थान,छत्तीसगड या पाच राज्यांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे. या एक्झिट पोलनंतर शेअर बाजार गडगडला.

सध्या देशभर निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ५ राज्यांचे एक्झिट पोल जाहीर करण्यास आले आणि त्याचा परिणाम सोमवारी सकाळी शेअर बाजारावर झालेला पाहायला मिळाला. एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीनुसार तीन राज्यांमध्ये भाजपला काँग्रेस टक्कर देणार असा अंदाज वर्तवण्यात आला. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला असून सेनसेक्स ६०० अंकांनी घसरला आहे. तर रुपया ५४ पैशांनी घसरला आहे. सध्या सेनसेक्स ५८८ अंकावर असून ३६ हजार ८४वर सुरु आहे. तर निफ्टीदेखील १७८ अंकांनी घसरला आहे.

पाहा- Live Result : धुळे महापालिका निवडणूक, भाजप ३७ जागी आघाडीवर

५ राज्यांचे एक्झिट पोल

तेलंगणा, मिझोराम, राजस्थान,छत्तीसगड या पाच राज्यांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे. एक्झिट पोलनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये भाजपला काँग्रेस काटे की टक्कर देणार आहे. त्यामुळेच शेअर बाजारात ही हालचाल झाली आहे. भाजपची सत्ता ढासळली तर त्याचा परिणाम पुढील काळाच शेअर बाजारात नेमका कसा होईल ते येत्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईलच.

- Advertisement -
माहीत आहे का?? –  भाजपविरोधात विरोधकांची रणनिती ठरणार, आज बैठक

रुपयाही घसरला

आज दिवसाची सुरुवात सेन्सेक्सच्या घसरणीमुळे रुपयाही आज घसरला. रुपयामध्ये ५४ पैशांची घट झाली असून आजचा रुपयाचा भाव ७१.३४ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -