घरअर्थजगतफेसबुकने बाजारात आणला आपला सेट टॉप बॉक्स

फेसबुकने बाजारात आणला आपला सेट टॉप बॉक्स

Subscribe

फेसबुकने आपल्या पोर्टल या उपकरणाची नवीन मालिका सादर केली असून यात सेट टॉप बॉक्सचादेखील समावेश आहे. फेसबुकने आधीच पोर्टल हा स्मार्ट डिस्प्ले ग्राहकांना सादर केला आहे. आता याच उपकरणांची नवीन मालिका लाँच करण्यात आलेली आहे. यामध्ये पोर्टल, पोर्टल मिनी आणि पोर्टल टीव्ही या मॉडेल्सचा समावेश आहे. यातील पोर्टल आणि पोर्टल मिनी या मॉडेल्समध्ये अनुक्रमे १० आणि ८ इंच आकारमानाच्या आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आलेला आहे. तर पोर्टल टीव्ही या सेट टॉप बॉक्सला कोणत्याही टीव्हीशी संलग्न करता येणार आहे. अर्थात, यात टीव्हीलाच स्मार्ट डिस्प्ले म्हणून वापरता येईल. या तिन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे १७९, १२९ आणि १४९ अमेरिकन डॉलर्स इतके आहे.

पोर्टलच्या या तिन्ही मॉडेल्सला फोटो फ्रेम तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी उपयोग करता येणार आहे. याच्या जोडीला यावरून व्हिडिओ कॉल्स करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात कृत्रिम बुध्दीमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाने युक्त असणारी प्रणाली दिलेली आहे. तर सुरक्षेसाठी यातील कॅमेरा अथवा मायक्रोफोन सुलभपणे बंद करण्याची सुविधाही आहे. याचा वापर करून व्हॉटसअ‍ॅप तसेच फेसबुक मॅसेंजरवर व्हिडिओ कॉलिंग करता येईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यात इनबिल्ट अलेक्झा हा व्हर्च्युअल डिजिटल असिस्टंट दिलेला आहे. यात ‘हे पोर्टल’ आणि ‘अलेक्झा’ या व्हाईस कमांड म्हणजे ध्वनी आज्ञावलीचा वापर करून विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो. या तिन्ही मॉडेल्समध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओ हे अ‍ॅप दिलेले आहे. यावरून कुणीही हवा तो व्हिडिओ पाहू शकतो. याच्या जोडीला स्पॉटीफाय, पंडोरा, आयहार्ट रेडिओ आणि आयहार्ट रेडिओ फॅमिलीवरून संगीताचा आनंद घेऊ शकतो. पहिल्या टप्प्यात हे तिन्ही मॉडेल्स अमेरिकेसह निवडक देशांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -