घरअर्थजगतयू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

Subscribe

पर्यावरणस्नेही इमारतींच्या मानांकनासाठी जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल डिझाइन (लीड) या मानांकन पद्धतीनुसार द यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने (यूएसजीबीसी) भारतातील सर्वोच्च 10 राज्यांची यादी जाहीर केली आहे. भारतासाठी अशा प्रकारे यादी प्रसिद्ध करण्याचे हे दुसरे वर्ष असून लीड प्रमाणित एकत्रित ढोबळ प्रति चौरस फूट निकषावर राज्यांची क्रमवारी ठरवली जाते.

भारत हा पर्यावरणस्नेही इमारतींच्या बाबतीत आघाडीवर असून प्रत्येक वर्षानुगणिक यात अधिकाधिक सुधारणा होत आहे, असे यूएसजीबीसी आणि ग्रीन बिझनेस सर्टिफिकेशन इनकॉर्पोरेशनच्या (जीबीसीआय) आग्नेय आशिया आणि पश्चिम आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गोपाळकृष्णन पद्मनाभन यांनी सांगितले. अनेक सरकारी यंत्रणा आणि राज्य सरकारांनी लीडला अनुसरून प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली असून भारतातील सर्वच क्षेत्रातील व्यवसाय, शैक्षणिक संस्था आणि सेवाभावी संस्था लीडचा अवलंब करण्यास कटिबद्धता व्यक्त करत आहेत. या सर्व क्षेत्रांमधील नेतृत्वाने शाश्वत, निरोगी आणि पर्यावरणस्नेही इमारतींसाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली असून आपल्या समुदायातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी ते कार्यरत आहेत.

- Advertisement -

शाश्वत उपायांना प्राधान्य देऊन, निरोगी वातावरणाची निर्मिती करून, संसाधनांचा काटेकोर वापर करून आणि खर्च कमी करून कमीत कमी कार्बन उत्सर्जन करणार्‍या इमारतीसाठी लीड हे शाश्वत गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय प्रतीक आहे. लीड प्रमाणित इमारती तेथील लोकांसाठी निरोगी वातावरणाची निर्मिती करतात, तसेच त्या कमी ऊर्जा व कमी पाण्याचा वापर करतात, हवेतील प्रदूषण कमी करतात, अंतर्गत भागात शुद्ध हवा पुरवतात आणि उद्योग-व्यापार व कुटुंबांसाठी पैशांचीही बचत करतात. पारंपरिक इमारतींच्या तुलनेत पर्यावरणस्नेही इमारतींमधून केवळ बांधकामाच्या कालावधीतच नव्हे, तर त्या इमारती पूर्ण होऊन वापर सुरू झाल्यानंतरच्या काळात, तसेच तिच्या संपूर्ण आयुष्यमानाच्या कालावधीतही उत्सर्जनाचे प्रमाण कमी असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -