आता WhatsApp वर मिळणार PF ची सेवा

ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) आपल्या  WhatsApp हेल्पलाइन सर्व्हिस (EPFO WhatsApp Helpline Service) सुरू केली आहे. यासंबंधी केंद्रीय कामगार (Labour Ministry) मंत्रालयाने म्हटले आहे की, EPFOकडे येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. ईपीएफओ, सीपीजीआरएएमएस (CPGRAMS), सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि ट्विटरचे ऑनलाइन तक्रारीचे रिझोल्यूशन पोर्टल (EPFIGMS Portal) हे २४ तास कार्यरत कॉल सेंटर ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करतात.

काय आहे सविस्तर माहिती 

कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार EPFO आपल्या सदस्यांसाठी WhatsApp आधारित हेल्पलाइन आणि तक्रार निवारण यंत्रणा सुरू केली आहे. कोरोनाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या व्यत्ययाशिवाय ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र आता EPFO च्या सर्व १३८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये WhatsApp हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. कोणताही संबंधीत पक्ष त्यांच्या पीएफ खात्याशी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या हेल्पलाइन नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवरून EPFO शी संबंधित सेवांबद्दल तक्रार करू शकतो.

ईपीएफओने आतापर्यंत १ लाख, ६४ हजार ०४० हून अधिक तक्रारींचे निराकरण केले आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन नंबर जाहीर झाल्यानंतर ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारी किंवा प्रश्नांमध्ये ३० टक्के कपात झाली आहे. त्याचबरोबर ईपीएफआयजीएमएस पोर्टलवर १६ टक्के कमी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा –

राज्यात उद्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसची भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’