स्टेट बँकेने फिक्स डिपॉजिटच्या व्याजदरात केली कपात; असे आहे नवे दर

हे नवे व्याजदर १० नोव्हेंबरपासून लागू करण्यात येत आहे.

Mumbai

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने फिक्स डिपॉजिटवरील व्याजाच्या दरात शुक्रवारी कपात केली आहे. यामध्ये एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.१५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तर, मोठ्या रकमेच्या ठेवींवर ३० ते ७५ बेसिस पॉइंटची कपात करण्यात आली आहे. हा निर्णय घेतल्यानंतर MCLR आधारित कर्जाच्या व्याज दरात ०.५ टक्क्यांची कपात केली आहे. हे नवे व्याजदर १० नोव्हेंबरपासून लागू करण्यात येत आहे.

असे आहेत SBIच्या FDचे नवे दर

  • ७ ते ४५ दिवसांच्या मुदत ठेवीवर ४.५० टक्के व्याजदर मिळणार
  • ४६ पासून १७९ दिवसांसाठी असणाऱ्या फिक्स डिपॉजिटवर ५.५० टक्के व्याज असणार
  • बँक १८० दिवसांपासून २१० दिवसांकरता फिक्स डिपॉजिटवर ५.८० टक्के व्याज मिळणार
  • २११ दिवसांपासून १ वर्षांपर्यंत SBI या कालावधी दरम्यान फिक्स डिपॉजिटवर ५.८० टक्के व्याज देईल

चालू आर्थिक वर्षांत स्टेट बँकेनं MCLR आधारित कर्जाच्या व्याजदरांत सातव्यांदा कपात केली आहे. नव्या निर्णयामुळं एक वर्षापर्यंतच्या कर्जावरील ‘एमसीएलआर’चे व्याज दर ८ टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. अर्थव्यवस्थेतील परिस्थिती लक्षात घेऊन बँकेने मुदत ठेवींवरील व्याज दरात देखील बदल केले आहेत. यामुळे बँकेने एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.१५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.