घरअर्थजगतपहिल्यांदाच सेन्सेक्स ४१,००० अंकांच्या पार

पहिल्यांदाच सेन्सेक्स ४१,००० अंकांच्या पार

Subscribe

याचा भारतीय बाजारांवर चांगला परिणाम झाला आहे

शेअर बाजारामध्ये सध्या तेजी आल्याने सेन्सेक्सने विक्रमी उसळी घेतली आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्स ४१,००० अंकांच्या पार गेला आहे. आज मंगळवारी सकाळच्या वेळी शेअर मार्केट उघडताच ४१,०२२.८५ अंकांवर खुला झाला तर दुसरीकडे निफ्टीमध्ये ३६.४५ अंकांनी वाढ होऊन १२, ११०.२० अंकांवर गेला आहे.

भारतीय बाजारांवर चांगला परिणाम

यामुळे जगातील प्रमुख असणारे शेअर मार्केटदेखील सोमवारी तेजीत आले असून आशियातील शेअर मार्केटही एक टक्क्यांनी वधारले आहे. याचा भारतीय बाजारांवर चांगला परिणाम झाला आहे. सकाळपासूनच सेन्सेक्सचे २१६.४८ अंकांच्या वाढीसह ४१,१०५.७१ अंकांवर व्यवहार सुरू होते. तर निफ्टी ५६.४५ अंकांच्या वाढीसह १२, १३०.२० अंकांवर ट्रेड करायला सुरूवात झाली होती.

- Advertisement -

शेअर मार्केटच्या सकाळी सुरूवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ज्या समभाग खरेदीत गुंतवणुकदारांनी सहभाग दाखवला, त्यामध्ये येस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, ओएनजीसी आणि सन फार्मा यांचा समावेश होता. तर दुसरीकडे भारती एअरटेल, पावरग्रीड, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक आणि एलअँडटी यांच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली. टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, सन फार्मा आणि येस बँक यांच्या समभागांमध्ये तेजी होती. तर इन्फ्राटेल, जी. लिमिटेड, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, ग्रासिम यांचे समभाग घसरले.


#WeAre420; आमदारांच्या आकड्यांवरून मजेदार ट्विट ट्रोल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -