घरअर्थजगतMaruti Suzuki: दिवाळीसाठी मिळतेय खास ऑफर; सरकारी कर्मचाऱ्यांचा फायदाच फायदा

Maruti Suzuki: दिवाळीसाठी मिळतेय खास ऑफर; सरकारी कर्मचाऱ्यांचा फायदाच फायदा

Subscribe

वाहन उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी Maruti Suzuki ने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांना Maruti Suzuki ची काही वाहने विकत घेताना ११ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. मारुती सुझुकीने Maruti Swift special edition च्या माध्यमातून हॅचबॅक स्विफ्ट या नव्या कारचे व्हर्जन बाजारात दाखल केले आहे. स्विफ्टच्या इतर मॉडेलपेक्षा या मॉडेलची किमंत २४,९९९ रुपयांनी अधिक असणार आहे. स्विफ्टच्या नियमित मॉडेलची किंमत ही ५.१९ लाख ते ८.०२ लाखांदरम्यान आहे. मारुतीने आपल्या या स्पेशल एडिशनला ब्लॅख थीम दिली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या ऑफरबद्दल मारुती सुझुकीने सांगितले की मागच्या काही दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना अवकाश यात्रा (LTC) च्या बदल्यात कॅश व्हाऊचर देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडे चांगलीच रोकड येत असून ते यातून गरजेच्या वस्तू विकत घेऊ शकतात. याच घोषणेचा फायदा घेत Maruti Suzuki ने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्या ऑफरची घोषणा केली. यातून आता कंपनीला किती फायदा होईल, हे येणाऱ्या काळात दिसेल.

- Advertisement -

कुणाला मिळू शकतो या ऑफरचा लाभ

कंपनीने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी, पोलीस, अर्धसैनिक दल आणि केंद्र वर राज्य सरकारमधील सर्व कर्मचाऱ्यांना Maruti Suzuki च्या ऑफरचा लाभ मिळू शकतो.

Maruti Suzuki च्या विपणन आणि विक्री विभागाचे संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता वाढावी, म्हणून अनेक आर्थिक उपाय राबवत आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही देखील काही उपाययोजना राबवत आहोत. देशात सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या एक कोटींच्या आसपास आहे. मारुतीसाठी हा मोठा ग्राहक वर्ग ठरू शकतो, यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आम्ही ऑफर काढली.

- Advertisement -

नव्या स्विफ्टची काय आहेत वैशिष्ट्ये

मारुतीने नव्या स्विफ्टमध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. स्टँडर्ड स्विफ्ट कारच्या तुलनेत हे लिमिटेड एडिशनचे मॉडेल अधिक आकर्षक दिसणारे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -