घरअर्थजगतएसबीआयमध्ये पैसे जमा करताय?

एसबीआयमध्ये पैसे जमा करताय?

Subscribe

मग मोजावे लागणार ५६ रुपये

एक ऑक्टोबरपासून भारतीय स्टेट बँकेने आपले बँक चार्ज आणि ट्रॅन्झॅक्शनच्या नियमांत बदल केले आहेत. बँक एक ऑक्टोबरपासून आपल्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल करणार आहे. ज्यात बँकेत रुपये जमा करणे, काढणे, चेक वापरणे, एटीएम ट्रॅन्झॅक्शन यासंबंधित सर्व्हिस चार्ज सामील आहेत.

बँकेच्या सर्क्युलर प्रमाणे एक ऑक्टोबरपासून आपण एक महिन्यात केवळ तीन वेळा मोफत पैसे जमा करू शकतात. यानंतर खात्यात रुपये जमा करण्यासाठी 50 रुपये (जीएसटी अतिरिक्त) चार्ज द्यावा लागेल. पाचवी किंवा त्यानंतर रक्कम जमा करण्यासाठी आपल्याला 56 रुपये चार्ज मोजावा लागेल मग ती रक्कम एक रुपये का नसो.

- Advertisement -

या व्यतिरिक्त एखाद्या कारणामुळे चेक बाऊंस झाल्यास चेक जारी करणार्‍यावर 150 रुपये (जीएसटी अतिरिक्त) भरावे लागतील. जीएसटीसह हा चार्ज 168 रुपये असणार. नवीन नियमांप्रमाणे जेथे बँकेने एटीएमद्वारे होणार्‍या ट्रॅन्झॅक्शनची संख्या वाढवली आहे. तेथे बँकेच्या शाखेत जाऊन एनईएफटी आणि आरटीजीएस करणे महागात पडेल.

बँकेने एक पत्रक जारी करत म्हटले की देशाचे सहा मेट्रो शहर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूरू आणि हैदराबाद येथे बँकेच्या एटीएमवर लोक दर महिन्याला 10 ट्रॅन्झॅक्शन करू शकतील. तसेच इतर शहरात एसबीआयच्या एटीएमवर 12 ट्रॅन्झॅक्शन करू शकतील. जर ग्राहक दुसर्‍या बँकेचा एटीएम वापरत असेल तर त्याला महिन्यात पाच ट्रॅन्झॅक्शन ची सुविधा देण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -