सणासुदीला गाडी घेण्याचे स्वप्न करा पुर्ण; केवळ ७९९ रुपयांच्या EMI मध्ये मिळतेय टाटाची गाडी

tata motors offers
टाटा मोटर्सची खास ऑफर

दसरा-दिवाळीच्या मुहुर्तावर जर तुम्हाला स्वतःची गाडी घ्यायची असेल तर टाटा मोटर्सने तुमच्यासाठी अफलातून ऑफर आणली आहे. तसं सणासुदीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणत असतात. टाटा मोटर्सनेही विक्री वाढविण्यासाठी HDFC बँकेसोबत एक करार करुन ग्राहकांना आर्थिक साहाय्य करण्याची योजना आणली आहे. यामुळे केवळ ७९९ रुपयांचा हप्ता (प्रति लाख) देऊन तुम्हाला गाडी विकत घेता येणार आहे. Gradual Step Up Scheme आणि TML Flexi Drive Scheme या दोन योजनांच्या माध्यमातून विक्री वाढविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२० पर्यंत या योजना उपलब्ध आहेत.

टाटा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार BS6 रेंज, SUV आणि इलेक्ट्रिक गाड्यांवर या योजना लागू आहेत. Gradual Step Up Scheme या योजनेतंर्गत ७९९ रुपयांचा मासिक हप्ता (प्रति लाख) असणार आहे. अर्थात ग्राहक कोणती गाडी निवडतात, त्यानुसार देखील ईएमआयची रक्कम कमी-जास्त होऊ शकते. ग्राहकांच्या क्षमतेनुसार दोन वर्षांत हळुहळु ईएमआय वाढविला जाईल.

हे पण वाचा – Maruti Suzuki: दिवाळीसाठी मिळतेय खास ऑफर; सरकारी कर्मचाऱ्यांचा फायदाच फायदा

तर TML Flexi Drive Scheme या योजनेतंर्गत ग्राहकांना वर्षातील तीन महिने निवडण्याचा पर्याय असेल, ज्यामध्ये केवळ ७८९ रुपयांचा मासिक ईएमआय (प्रति लाख) भरता येणार आहे. पहिल्या योजनेसारखेच गाडीच्या प्रकारावर याची रक्कम अवलंबून असेल. या दोन्ही योजनांसोबतच टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या एक्स शोरुमसाठी १०० टक्के फायनान्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वतःच्या गाडीचे स्वप्न पुर्ण करा

टाटा मोटर्सचे मार्केटिंग विभागाचे प्रमुख विवेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, टाटाच्या या दोन योजना ग्राहकांना स्वतःची गाडी घेण्याचे स्वप्न करण्यासाठी आहेत. दोन्ही योजना ईएमआय भरण्यासाठी सुट देणाऱ्या आहेत. तर एचडीएफसी बँकेचे रिटेल प्रमुख अरविंद कपिल म्हणाले की, टाटासोबत आम्ही भागीदारी केल्यामुळे ग्राहकांना याचा चांगलाच फायदा मिळेल.