घरअर्थजगत२०२१ मध्ये 'अपना टाईम आएगा'; अर्थव्यवस्थेत भारत चीनला मागे टाकणार

२०२१ मध्ये ‘अपना टाईम आएगा’; अर्थव्यवस्थेत भारत चीनला मागे टाकणार

Subscribe

भारतीय अर्थव्‍यवस्‍थेसाठी यंदाचे वर्ष कोरोना संकट आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाईट असल्याचे सर्व अर्थतज्ज्ञांनी सांगितले असताना पुढील वर्ष मात्र अर्थव्यवस्थेला गती देणार असणार आहे, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तवला आहे. पुढील वर्ष म्हणजेच २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल आणि चीनलाही मागे टाकणारे असणार असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात जागतिक बँकेने भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच जीडीपी या वर्षी ९.६ टक्क्यांपर्यंत घटेल असे म्हटले होते. याशिवाय मूडीजसह इतर अनेक मोठ्या रेटिंग संस्थांनी आधीच जीडीपीमध्ये घट होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

- Advertisement -

आंतराराष्ट्रीय नाणेनिधीने जगातील अर्थव्यवस्थेबाबत एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालामध्ये हे सगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. हा अहवाल वर्ल्ड बँकेच्या वार्षिक बैठकीआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सादर केला आहे. २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ४.४ टक्क्यांनी घसरेल आणि २०२१ मध्ये ५.२ टक्क्यांनी वधारेल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत ५.८ टक्के घसरण होईल, असाही अंदाज आहे. तर २०२१ मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था ३.९ टक्के वधारेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आयएमएफनुसार, चीनची अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ८.२ टक्क्यांच्या वाढीपर्यंत जाऊ शकेल. दुसरीकडे २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ८.८ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. मागील वर्षी भारताचा आर्थिक विकासाचा दर ४.२ टक्के इतका राहिला होता.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामीला बजावली कारणे दाखवा नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -