घरअर्थजगतमहिला बचत गटांची उत्पादने आता अ‍ॅमेझॉनवर

महिला बचत गटांची उत्पादने आता अ‍ॅमेझॉनवर

Subscribe

महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचत गटांची उत्पादने अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचत गटांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने थेट खरेदी करू शकतात. मागील काही वर्षात बचत गटांच्या चळवळीने अशी ऑनलाईन क्रांती अनुभवली आहे.

अ‍ॅमेझॉन हे जागतिक पातळीवरील अग्रमानांकीत असे ई- कॉमर्स व्यासपीठ आहे. शॉपिंगप्रेमींचे हे आवडते मोबाईल अ‍ॅप असून यावर दररोज मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्य शासनाने आता बचत गटांची उत्पादने या अ‍ॅपवर उपलब्ध करून बचत गटांना मोठी बाजारपेठ मिळवून दिली आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागातील महिलांचा जीवनस्तर उंचावत त्यांच्या उद्यमशीलतेला वाव देत प्रगतीचा नवीन टप्पा त्यांच्या आयुष्यात यावा, यासाठी नवतेजस्विनी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नवतेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत 365 लोकसंस्थांची उभारणी करून त्या स्वबळावर उभ्या राहिल्या. नवतेजस्विनी ग्रामीण उपजिवीका विकास हा 528 कोटी 55 लाख रुपये किमतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून 10 लाख कुटुंबे द्रारिद्य्रातून बाहेर येऊन आपत्कालीन स्थितीतही तग धरू शकतील.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 5 लाख बचत गटांची चळवळ अधिक गतीमान होणार असून राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडीत उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार आहे. पुढील सहा वर्षांच्या कालावधीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) हा प्रकल्प राबविण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -