घरअर्थजगतया बँकेत तुमचे खाते आहे का? ही बँक ५० शाखा बंद करतेय

या बँकेत तुमचे खाते आहे का? ही बँक ५० शाखा बंद करतेय

Subscribe

खासगी बँकाचे कधी काय होईल? काहीही सांगता येत नाही. त्यामुळेच लोकांचा आजही राष्ट्रीयकृत बँकांवर गाढा विश्वास आहे. सध्या अशीच एक खासगी बँक घोटाळ्यांमुळे अडचणीत आलेली आहे. येस बँक लवकरच आपल्या ५० शाखा बंद करणार आहे. तसेच आपल्या एटीएमची संख्या देखील कमी करण्याचा विचार येस बँक करत आहे. याचे कारण चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ही खासगी बँक २० टक्के कपातीचे लक्ष्य ठेवून काम करत आहे. बँकेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, बँकेने लीजवर न दिलेल्या जागा परत आहे. तसेच भाड्याने घेतलेल्या जागांवर पुन्हा एकदा भाडे दर निश्चिती करण्यात येणार आहे.

फायनान्शिय एकप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार येस बँकेचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी राणा कपूर यांच्या कार्यकाळात बँकेतील कामात अनेक गैरप्रकार झाले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांनी एकत्रिकरणाच्या माध्यमातून भांडवल उभे करत येस बँकेला वाचविले. त्यानंतर मार्च महिन्यात प्रशांत कुमार यांना नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. कुमार यांनी सांगितले की, बँकेचे मोठे करबुडवे कोर्टात गेल्यामुळे त्यांच्याकडून कर्जवसूली करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेचा नफा २१ टक्क्यांनी कमी झाला आहे.

- Advertisement -

प्रशांत कुमार पुढे म्हणाले की, बँकेचे किंमतीवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळेच चालू आर्थिक वर्षात बँक चालविण्याच्या खर्चात २० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक पातळीवरील सल्लागाराने हा पर्याय सुचविला. आम्ही याआधीच मुंबईतील इंडियाबुल्स फायनान्स सेंटरमधील दोन मजले सोडले आहेत. तसेच बँकेच्या सर्व १,१०० शाखांच्या भाड्यासंदर्भात आम्ही नव्याने वाटाघाटी करत आहोत. यामुळे बँक देत असलेल्या भाड्यात २० टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान कामकाजात तर्कसंगत करण्याच्या हेतून ५० शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील जवळ-जवळ असलेल्या आर्थिकदृष्या सक्षम नसलेल्या शाखांना बंद केले जाईल. याशिवाय एटीएमचीही संख्या कमी करण्याचा विचार बँकेकडून होत असल्याचे कुमार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -