घरCORONA UPDATEनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात; हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात; हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

Subscribe

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. एकनाथ शिंदे यांची दुसरी कोविड १९ चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर डॉक्टररांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह निघाली होती. त्यामुळे कोणतीही जोखीम न पत्करता ते तात्काळ ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. गेल्या १० दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी अखेर कोरोनावर मात केली. आज, रविवारी त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र घरीही ते पुढील काही दिवस पूर्णतः विश्रांती घेणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या महिन्यातील २४ तारखेला राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. शिंदे यांनी ट्विटरवर माहिती देत म्हटले होते की, ‘काल माझी कोविड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने प्रकृती ठीक आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी’, अशी विनंती मंत्री शिंदे यांनी केली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona Vaccine : ‘जुलै २०२१ पर्यंत भारतीयांना लस पोहोचवण्याचे लक्ष्य’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -