घरक्राइममुलाने रचला आईच्या बॉयफ्रेंडच्या अपहरणाचा मास्टर प्लॅन

मुलाने रचला आईच्या बॉयफ्रेंडच्या अपहरणाचा मास्टर प्लॅन

Subscribe

पोलीसांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

अनैतिक संबंधांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातून होणाऱ्या भीषण गुन्ह्यांची संख्याही वाढू लागली आहे. नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मित्राच्या सहाय्याने एका अप्लवयीन मुलानेच आपल्या आईच्या प्रियकराचे अपहरण करुन त्याच्या खुनाचा डाव रचला. या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ माजली आहे. प्रदिप असे मुलाच्या आईच्या प्रियकराचे नाव आहे. आईचे अनैतिक संबंध असल्याचे मुलाला सहन झाले नाही आणि त्याने मित्रांसोबत त्याचे अपहरण करुन त्याच्या हत्येचा कट रचला. सोळा वर्षीय मुलाच्या आईचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. पवन असे मुलाचे नाव आहे. राग अनावर झाला आणि पवनने अपहरणाचा डाव रचला.

प्रदिप या आईच्या प्रियकराचा काटा काढण्याचा त्याने प्लॉन केला. प्रदिप हा गांधीबाग येथील एका कापडाच्या दुकानात काम करतो. पवनच्या आईला भेटायला तो सतत त्याच्या घरी यायचा. पवन आणि प्रदिप यांच्यात काही भांडणेही झाली होती. सोळा वर्षीय पवनचा राग अनावर झाला आणि त्याने प्रदिपच्या हत्येचा कट रचला. तयार केलेल्या प्लॅनप्रमाणे बुधवारी रात्री पवन आणि त्याचे मित्र स्कूटरवरुन प्रदिपच्या दुकानात गेले. चाकूचा धाक दाखवून त्यांनी प्रदिपला गाडीवर बसवून त्याला अज्ञात ठिकाणी घेऊन जात होते. प्रदिपचे अपहरण करुन त्याला घेऊन जात असताना इतवारी परिसरात अचानक दोन पोलीस दिसल्यामुळे प्रदिपची अपहरणकर्त्यापासून सुटका झाली.

- Advertisement -

ताबडतोब प्रदिपने पवनच्या आईला फोन करुन तिला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पवनने तहसील पोलीस स्टेशनमध्ये पवन विरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पवनला ताब्यात घेतले. पवन आणि त्याचे मित्र प्रदिपचे अपहरण करुन त्याला कुठे घेऊन जाणार होते याची पोलीस चौकशी करत आहेत.


हेही वाचा – अनैतिक संबंधाचा संशय; दोन्ही हात, पाय व मुंडके धडापासून केले वेगळे

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -