यूपीनंतर बिहारही सामूहिक बलात्काराने हादरलं; आईवर बलात्कार करुन मुलासह नदीत फेकलं

बिहारमधील बक्सरमध्ये नराधमांनी आपल्या पाच वर्षाच्या मुलासह बँकेत जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर महिलेला आपल्या मुलासह बांधलं आणि तिला नदीत फेकलं. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेने बिहार हादरलं आहे.

मुरार पोलीस ठाण्यातील ओझा बराव गावात बँकेत जाणाऱ्या महिलेला तिच्या मुलासह पळवून नेलं आणि त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासह मुलाला बांधून नदीत फेकून दिलं. या घटनेसंदर्भात पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की त्यांची मुलगी आपल्या पाच वर्षाच्या निरागस मुलासह बँकेत गेली होती. पण रात्री ११ नंतर पीडितेचा मोबाईल बंद झाला. सकाळी तिच्यासह तिचा मुलगाही नदीत बांधलेल्या अवस्थेत आढळला. पीडित महिला वाचली, पण निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. वडिलांच्या म्हणण्यानुसार पीडितेने सांगितलं की काही लोकांनी तिला घेरलं आणि त्यानंतर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेला मुलासह बांधलं आणि तिला नदीत फेकलं.

पीडिती महिला वाचवण्यासाठी आरडाओरडा करु लागली तेव्हा लोक तिला वाचवण्यासाठी आले. त्यानंतर तिला बाहेर काढण्यात आलं. मात्र, तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर एकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरुन गेला असताना दररोज बलात्काराच्या घटना घडत आहेत.


हेही वाचा – वाह रे काँग्रेस! बलात्कारी उमेदवाराला तिकीट का दिले? प्रश्न विचारला म्हणून महिलेला मारहाण