घरक्राइमऑनलाइन शॉपिंग दरम्यान झाली फसवणूक; १८वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

ऑनलाइन शॉपिंग दरम्यान झाली फसवणूक; १८वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

Subscribe

बारावीचे क्लासेस ऑनलाइन असल्यामुळे अभ्यासासाठी मोबाईल घेतला होता.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूकीच्या अनेक घटना समोर येत असतात. ऑनलाईन शॉपिंगमध्ये फ्रॉडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच एका घटनेतून एका मुलाने टोकाचे पाऊल उचलले. ऑनलाइन शॉपिंग कंपनीकडून फसवणूक झाल्याने अठरा वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. चंद्रपूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

चंद्रपूर मधील चिमूर तालुक्यातील पूयारबंद येथे हि घटना घडली. रोहित जांभुळे असं मृत मुलाच नाव आहे. कोरोनाच्या काळात शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत.ऑनलाइन शिक्षणासाठी रोहितने नवीन मोबाईल घेण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्याने ऑनलाइन साइट वरून मोबाईलची ऑर्डर दिली. मोबाईलची एकूण किंमत १५ हजार रूपये इतकी होती. त्यातील १० हजार रूपये त्याने ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. राहिलेले ५ हजार रूपये पार्सल मिळाल्यानंतर द्यायचे होते. ठरलेल्या दिवशी रोहितला कंपनीकडून पार्सल घेण्यासाठी फोन आला. पार्सल मिळल्यानंतर त्यात मोबाईल ऐवजी २ पॉकेट १बेल्ट आणि खरडा अशा वस्तू समोर आल्या. हा सगळा प्रकार पाहून रोहित आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे झाल्याचे लक्षात येताच रोहितने तातडीने कंपनीला फोन केला.परंतु कंपनीचा फोन लागला नाही.

- Advertisement -

रोहितच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. बारावीचे क्लासेस ऑनलाइन असल्यामुळे अभ्यासासाठी मोबाईल घेतला होता असं रोहितच्या वडिलांनी सांगितलं. पैशाची जुळवाजुळव करून रोहितच्या आईने त्याला पैसे दिले होते. मात्र १५ हजारांचा फटका बसेल असं त्यांना वाटलं नव्हतं. या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला.आपली फसवणूक झाल्याचे दु:ख रोहितला आवरता आले नाही. त्याच दिवशी तो घरातून बेपत्ता झाला. रोहित बेपत्ता झाल्याचे कळताच कुटुंबिय आणि मित्रमंडळींनी शोधाशोध सुरू केली. शेताच्या कडेलगत असलेल्या विहिरीच्या बाहेर रोहितची गाडी आणि कपडे दिसले. रोहित विहिरीत पडल्याचा संशय आल्याने गावकऱ्यांनी विहिरीत शोध घेतला त्यावेळी मृत अवस्थेतून रोहितला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.


हेहि वाचा – पत्नीचं मुंडकं घेऊन हैवान २ किलोमीटर चालतचं राहिला, मग गाठलं पोलीस ठाणं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -