Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम एअरपोर्टचे क्वारंटाईन पैसे घेऊन करायचा बायपास, महापालिकेचा अभियंता निलंबित

एअरपोर्टचे क्वारंटाईन पैसे घेऊन करायचा बायपास, महापालिकेचा अभियंता निलंबित

याप्रकरणी तिघांना अटक

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना अलगीकरणात ठेवण्यात येते. मात्र अलगीकरणातून सूट देण्याच्या नावाखाली प्रवाशांकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका पालिका अभियंत्याला अटक करण्यात आली असुन दुय्यम अभियंता दिनेश गावंडे असे या अभियंत्याचे नाव आहे. तसेच त्याला पालिकेच्या सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. महापालिकेने दोन संशयितांविरुद्धही सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा  एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विमानतळावर नेमलेला महापालिकेचा दुय्यम अभियंता दिनेश एस. गावंडे हा विमानतळावर विदेशातून येणाऱया प्रवाशांना अवैध्यरित्या विलगीकरणातून अन्य दोन साथीदारांच्या मदतीने सूट देत पैसे उकळत होता. ही बाब ड्यूटीवर असणाऱ्या सीआरपीएफ जवानाच्या लक्षात आली. त्यानंतर या सीआरपीएफ जवानाने ही घटना रात्रपाळीवर असलेले पोलिस अधिकारी व महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता वकार जावेद हफिझ यांच्या निदर्शनास आणून दिला.

पालिकेने याप्रकरणाची तातडीने दखल मुख्य आरोपी दिनेश गावंडेची सीआयएसएफच्या मदतीने झडती घेत त्याच्याकडून बनावट शिक्के व रक्कम जप्त केली. यामध्ये अन्य कंपन्यांचे दोन अधिकारी संशयित आढळले. या घटनेनंतर पालिकेने आरोपी दिनेशला तत्काळ निलंबित केले. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. परदेशातून हवाई मार्गाने मुंबईत येणाऱया प्रवाशांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. नियमांची कठोर अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -