घरक्राइमप्रेम पडलं महागात; पिस्तुलाचा धाक दाखवून प्रेयसीला ऑफिसमधूनच उचलले

प्रेम पडलं महागात; पिस्तुलाचा धाक दाखवून प्रेयसीला ऑफिसमधूनच उचलले

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ऑफिसमधून एका तरुणीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते.असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ऑफिसमधून एका तरुणीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा थरार ऑफिसच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शंतनू चिंचवडे या आरोपीच्या तावडीतून सहा तासांच्या आत तरुणीची सुटका केली असून आरोपी शंतनूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शंतनू चिंचवडे आणि तरुणी यांच्यात प्रेम संबंध असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. त्यातच हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओत?

या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व कर्मचारी काम करताना दिसत आहेत. त्यातच एक तरुण तरुणीला पिस्तुलचा धाक दाखवून ऑफिसमधून घेऊन जाताना दिसत आहे. त्यात तरुणी तरुणाला विरोध करताना दिसत आहे. मात्र, आरोपी तरुण तिचे ऐकण्याच्या मनस्थित नसल्याने तो तिला जबरदस्ती घेऊन जाताना दिसत आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


हेही वाचा – कॉपीराईटचे उल्लंघनप्रकरणी महामूव्हीच्या CEO ला अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -