घरक्राइमकल्याणमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत, चाकूने हल्ले करून सुरु केली लूट

कल्याणमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत, चाकूने हल्ले करून सुरु केली लूट

Subscribe

चाकूने वार करून लूट केल्याची घटना कल्यणमध्ये घडली आहे.

कल्याणमध्ये दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरांनी लूटमार सुरु केली आहे. या चोराची हिम्मत एवढी वाढली आहे कि, रस्त्यावर जाणाऱ्या व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत लूटमार करीत आहे. अशाच काहीसा प्रकार कल्याणच्या संतोषी माता चौक परिसरता घडला. मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी २७ वर्षीय तरुणाला भररस्त्यात अडवून त्याची सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणाने विरोध करताच त्यापैकी एकाने चाकूचा धाक दाखवला. या तरुणाला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेला देखील चाकूने वार करून हे तिघे तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळून गेले. या घटनेमुळे कल्याण शहरात विशेष करून महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तीन सोनसाखळी चोराविरुद्ध गुन्हा दखल केला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

नेमके काय घडले?

कल्याणच्या संतोषी माता मंदिर रोड येथे राहणारा साहिल बागुल हा गुरुवारी दुपारी आपल्या मोटारसायकलवरून जात असताना संतोषी माता चौक या ठिकाणी एका मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी साहिलच्या दुचाकीला कट मारून पुढे गेले. त्यानंतर पुन्हा तिघे मागिरी फिरले आणि साहिलला रस्त्यात अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचण्याचा प्रयत्न करू लागले. साहिलने त्यांना विरोध करताच तिघापैकी एकाने स्वतःजवळील चाकूसारखे तीक्ष्ण हत्यार काढून साहिलच्या पोटाला लावले आणि एकाने साहिलला पकडून ठेवत गळ्यातील चैन काढण्याचा प्रयत्न करू लागले. हा सर्व प्रकार भररस्त्यात सुरु होता. अनेक जण हा प्रकार बघून देखील साहिलच्या मदतीला कोणीही पुढे येत नव्हते. अखेर एका महिला साहिलच्या मदतीला पुढे आली असता या चोरटयांनी या महिलेवर चाकूने वार केले आणि साहिलच्या गळयातील सोनसाखळी खेचून पोबारा केला. यामध्ये साहिल आणि शकुंतला पाटील ही महिला जखमी झाली. त्यांना ताबडतोब नजीकच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आणून त्याच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले.

- Advertisement -

हा सर्व प्रकार बघणाऱ्या साहिलच्या मित्राने या तिन्ही लुटारूंना ओळखले असून हे तिघे कल्याण बेतूरकर पाडा , काळा तलाव येथे राहणारे रोहित सोनी आणि विशाल सोनी आणि शेहबाज असल्याची माहिती पोलिसांना दिली. महात्मा फुले पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – ४१६ तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी केली कारवाई, २०७ सहप्रवाश्यांवर आखला दंड

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -