Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम पतीला तुरुंगातून बाहेर काढण्याचे अमिष दाखवून विवाहितेवर लैंगिक अत्याचार

पतीला तुरुंगातून बाहेर काढण्याचे अमिष दाखवून विवाहितेवर लैंगिक अत्याचार

मुंब्र्यातील ही घटना असून अटक करण्यात आलेली व्यक्ती इस्टेट एजंट आहे. 

Related Story

- Advertisement -

खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या पतीला बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचे अमिष दाखवून विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. मुंब्र्यातील ही घटना असून अटक करण्यात आलेली व्यक्ती इस्टेट एजंट आहे. चुन्नु उर्फ नौशाद बशीर सिद्दिक्की (४८) असे या इस्टेट एजंटचे नाव असून चुन्नुविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

मुंब्रा परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय पीडितेचा पती खुनाच्या गुन्ह्यात २००८ पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याला तुरुंगातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असताना पीडितेची ओळख इस्टेट एजंट चुन्नु उर्फ नौशादसोबत झाली. माझी पोलीस आणि वकिलांसोबत ओळख असून तुझ्या पतीला तुरुंगातून बाहेर काढून देतो, असे चुन्नुने पीडितेला आश्वासन देऊन ओळख वाढवली. त्यानंतर त्याने काही निम्मिताने पीडित विवाहितेला बळजबरीने मद्यप्राशन करायला लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

- Advertisement -

माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या पतीला दुसऱ्या एखाद्या गुन्ह्यात अडकवेन, अशी धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची तक्रार पीडित विवाहितेने रविवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी चुन्नुविरुद्ध लैंगिक अत्याचार, धमकी देणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

- Advertisement -