घरक्राइमसंतापजनक! वडिलांनी स्वप्नात येऊन असं काही सांगितले की, मुलांने आईलाच संपवले

संतापजनक! वडिलांनी स्वप्नात येऊन असं काही सांगितले की, मुलांने आईलाच संपवले

Subscribe

गुजरातमधील बडोदा येथे एका २७ वर्षीय मुलाने एका स्वप्नामुळे आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. गुजरातमधील बडोदा येथे ही घटना घडली असून यामध्ये एका निष्पाप आईला आपला जीव गमवावा लागला आहे. गुजरातमधील बडोदा येथे राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणाने आपल्या आईची हत्या करुन तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी दिव्येश बारिया याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमके काय घडले?

बडोदा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय दिव्येश बारिया यांनी ५० वर्षीय आईच्या छातीत आणि पोटात काच घुसवून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी आईचा मृतदेह घरामागच्या आवारात नेवून त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. मृतदेह पेटल्यानंतर त्याच्या शेजारी उभे राहून त्याने ‘ओम नम: शिवाय’चा जप सुरु केला. या दरम्यान शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहून पोलिसांना खबर दिली.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दिव्येश बारिया याची बहिणी आली. तिने याप्रकाराबाबत दिव्येशकडे विचारणा केली असता. त्यांनी सांगितले की, ‘मला स्वप्नात येऊन वडिलांनी सांगितले आहे आईला वर पाठव. यामुळे मी आईला ठार केले’, असे दिव्येशने कबुली दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – ‘लव्ह जिहाद कायद्याच्या माध्यमातून भाजप संविधानाची उडवतंय खिल्ली’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -