आजी करणी करते आणि आजारी पाडते; नातवाने केली आजीची हत्या

पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातील यशवंत नगर येथील घटना

आजी करणी करून आजारी पाडते या रागातून नातवाने आजीचा कुऱ्हाडीने हत्या केल्याचा प्रकार पालघर जिल्ह्यातील विक्रमगड जवळील यशवंतनगर येथे घडला आहे. या प्रकरणी आरोपी फरार आहे. विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास विक्रमगड पोलीस करीत आहे.

vikramgarh police

पालघर मधील विक्रमगड तालुक्यातील यशवंत नगर येथील सोनी जानू दांगटे वय ६२ वर्ष हीचा खून आरोपी नातूने केला आहे अशी माहिती विक्रमगड पोलिसांनी दिली आहे. सतत करणी करुन आजारी पाडते याचा संशयाने या अगोदर भांडणे होत होती. यात मयत आजीच्या मानेच्या पुढील बाजूस कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. या प्रकरणी नातेवाईक ११ ऑक्टोबरला तक्रारीवरून विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी फरार आहे.


हेही वाचा – सरसकट अँटिबायोटिक्स घेणाऱ्यांनो सावधान! होऊ शकतो दुर्मिळ आणि गंभीर आजार