पत्नीने दारु का पिता म्हणून हटकलं; पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून संपवलं

husband killed wife because she ask why drink alcohol

दारु का प्यायलात असे हटकले म्हणून पतीने पत्नीची हत्या केल्याच्या घटनेने पंढरपूर हादरले आहे. पतीने ऐन दिवाळीत पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करुन हत्या केल्याने शहरात खळबळ माजली आहे. आरोपी पती बाबा सावतराव याला आरोपीला अटक केली आहे. पंढरपूर शहरात हनुमान टेकडी गोशाळा परिसरात बुधवारी साडे तीनच्या वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मयत महिलेचे नाव राधिका बाबा सावतराव (वय ४९) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचा पती बाबा लक्ष्मण सावतराव हा नेहमी दारु प्यायचा. तो दारुच्या प्रचंड आहारी गेला होता. त्यामुळे पत्नी राधिका त्याला वारंवार दारू न पिण्याचा सल्ला देऊन समजूत काढत होती. यावरून राधिका आणि बाबा सावतराव यांच्यात भांडणे देखील झाली होती. नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी सुद्धा सावतराव दारू पिऊन आला होता. त्यामुळे राधिकाने त्याला हटकले. नेहमी दारु पिण्यावरुन बोलते याचा राग मनात धरुन ने घरातील कुऱ्हाडीने राधिकावर हल्ला केला. मानेवर, डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार केले. डोक्यात घाव बसल्यामुळे राधिका जागेवरच कोसळली. रक्त प्रवाह जास्त झाल्यामुळे राधिकाने जागीच जीव सोडला.

घरातील थरारक घटनेने आरोपी सावतराव आणि मयत राधिका यांचा मुलगा शिवम बाबा सावतरावव (१९) याने पंढरपूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामे केला. मयत राधिकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. मुलाच्या तक्रारीनंतर वडील बाबा सावतराव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स.पो.नि. मगदुम करीत आहेत.