जळगाव हादरलं! एकाच कुटुंबातील ४ अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या

jalgaon murder 2 girls and 2 boys murder dead body found in Farm

चार अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने गळा चिरुन केलेल्या हत्येने जळगाव हादरलं आहे. जळगावमधील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात शेतातील रखवालदाराच्या चार मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निघृण हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये २ मुली आणि २ मुलांचा समावेश आहे. या चारही मुलं ८ ते १३ वर्षाच्या वयोगटातील असून मुलांच्या हत्येने जळगाव हादरलं आहे.

बोरखेडा येथे शेताची रखवाली करण्यासाठी भिलाला कुटुंब राहतं. दोन मुलं आणि दोन मुली या चार भावंडांना ठेवून मिलाला दाम्पत्य गावाला गेलं असता गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने या चारही जणांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केली. या हत्येमागील कारणाचा आणि आरोपींचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना १५ ऑक्टोबरला मध्यरात्री घडली असा अंदाज वर्तवला जात आहे.

शएख मुश्ताक यांचं बोरगाव शिवारात शेत असून मयताब भिलाला अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात पत्नी, दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. भिलाला हे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी १५ ऑक्टोबरला पत्नी आणि १ मुलासह त्यांच्या गावी मध्य प्रदेशात गेले. तर दोन मुलं आणि दोन मुली या ४ भावंडांना घरी ठेवलं. आज १६ ऑक्टोबरला सकाळी शेख मुश्ताक शेतात आल्यावर त्यांना घर बंद दिसलं. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पाहिलं असता, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरात भिलाला यांची चारही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. यानंतर शेख यांनी तातडीने रावेर पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आली आहे. तसंच श्वान पथकाही मदत घेतली जात आहे. याशिवाय गावकऱ्यांची चौकशी केली जात असून या कुटुंबाचं इतर कोणाशी वैर होतं का? याची माहितीही पोलीस घेत आहेत. दरम्यान आरोपी लवकरच पकडला जाईल, असा दावा पोलीस करत आहेत.


हेही वाचा – Paytm वरुन व्यवहार करणाऱ्यांनो सावधान; कंपनीने बदलले नियम