जावयाचा सासूवर बलात्कार; तक्रार दाखल होताच आत्महत्येचा प्रयत्न

man tries to kill self after raping mother-in-law

तामिळनाडूमध्ये ३९ वर्षीय जावयाने आपल्या विधवा ५० वर्षीय सासूवर बलात्कार केल्याची घटना घडली. यानंतर त्याच्यावर पोलिसात तक्रार दाखल झाली तेव्हा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडूच्या कुद्दलोरे येथे ही घटना घडली. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी सासूच्या घरी गेला होता. तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या अंतर्गत भागात जखमा झाल्याने तिला कुद्दलोरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती मिळताचा पीडित महिलेची भेट घेत प्राथमिक चौकशी केली. पीडितेने दिलेल्या माहितीवरुन भा. दं. वी. कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपीला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी वेळेत धाव घेतल्याने आत्महत्या करण्यापासून वाचवलं.

उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराचं सत्र सुरुच

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरुन गेला असताना राज्यातील भदोही शहरात अुनसूचित जातीतल्या मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. तसंच, उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्ये आणखी एका २२ वर्षीय दलित विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या पीडिती मुलीवरही हाथरस प्रकरणाप्रमाणे घाईघाईने अंत्यसंस्कार उरकण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.