घरक्राइममुलाने डाउनलोड केलं App, वडिलांच्या खात्यातून ९ लाख गायब; चोरीची पद्धत वाचून...

मुलाने डाउनलोड केलं App, वडिलांच्या खात्यातून ९ लाख गायब; चोरीची पद्धत वाचून धक्का बसेल

Subscribe

देशात दिवसागणिक ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकरणात वाढ होत आहे. देशात सध्या डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीची प्रकरणही वाढली आहेत. नागपूरमध्ये देखील एक ऑनलाईन फसवणूकीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नागपूरमधील कोराडीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यामधून अज्ञाताने तब्बल ९ लाख चोरी केले आहेत. हे पैसे चोरण्यासाठी जी पद्धत वापरण्यात आली त्याने तुम्हाला धक्काच बसेल.

नागपुरमधील कोरोडीमध्ये अशोक मानवते नावाचे व्यक्ती राहतात. अशोक मानवते यांचा १५ वर्षांचा मुलगा आहे. त्याने वडिलांचा मोबाईल वापरत होता. यावेळी त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. हा फोन अशोक यांच्या मुलाने घेतला. फोन करणाऱ्या व्यक्तीने अशोक यांच्या मुलाला तो कस्टमर केयर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचं सांगितले. त्याने अशोक यांच्या मुलाला त्याच्या वडिलांच्या डिजिटल पेमेंट अकाउंटचे क्रेडिट लिमिट वाढवण्यात आले आहे, असे सांगितले. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने जसे जसे सांगितले तसे अशोक यांच्या मुलाने केले. फोन करणाऱ्याने अशोक यांच्या मुलाला, मोबईलमध्ये एक Application डाऊनलोड करायला सांगितले. त्याप्रमाणे त्याने ते App डाऊनलोड केले. त्यानंतर मुलाने App ओपन करताच कॉल करणाऱ्याने अशोक यांच्या खात्यामधून ८.९५ लाख रुपये चोरी केले.

- Advertisement -

App द्वारे पैसे चोरीला कसे गेले?

अशोक यांचे बँक खाते मोबाईलमधअये असणाऱ्या App शी जोडलेले होते. त्यामुळे नवे App डाऊनलोड केल्यानंतर ओपन करताच बँक खात्याचा संपूर्ण ऍक्सेस मिळाला. त्यानंतर संपूर्ण पैसे ट्रान्सफर करण्यात आले. याबाबत अशोक मानवते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळ, ठाकरे सरकार जबाबदार’; एसटी कंडक्टरची आत्महत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -