घरक्राइम'सिगारेट ओढ नाहीतर ठार मारेन!'; रुममेटच्या धमकीला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या

‘सिगारेट ओढ नाहीतर ठार मारेन!’; रुममेटच्या धमकीला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या

Subscribe

रुममेटच्या जबरदस्तीमुळे उचलले टोकाचे पाऊल

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सततच्या सिगारेट ओढण्याच्या आग्रहाला कंटाळून पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केली. सिगारेट ओढ नाहीतर तुला ठार मारेन अशी धमकी रुममेटने दिल्याने तरूणाने स्वतःचे जीवन संपवले. पुण्यातील कर्वे नगर भागातल्या गुरुदत्त कॉलनीत ही घटना घडली असून सागर अशोक पवार असे आत्महत्या केलेल्या १८ वर्षीय तरुणाचे नाव आहे.

हा तरुण गुरुदत्त कॉलनी कर्वेनगर पुणे येथील बॉईज हॉस्टेलमध्ये रहात होता. तो मूळचा जळगावचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे ही घटना समोर आली आहे. या तरुणाने १० ते १३ ऑक्टोबरच्या दरम्यान आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसानी ३० वर्षीय लक्ष्मण वासुदेव पाटील याला अटक केली आहे. दीपक पवार यांनी यासंदर्भातली फिर्याद वारजे पोलीस ठाण्यात केली होती.

- Advertisement -

रुममेटच्या जबरदस्तीमुळे उचलले टोकाचे पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, सागर पवारने त्याचे बारावीचे वर्ष नुकतेच पूर्ण केले होते. तो अनाथ असल्याने आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. शिक्षणानंतर मार्केटिंग क्षेत्रातील एका खासगी कंपनीत सागर कामालाही लागला होता. तीन दिवसांपूर्वी तो कर्वे नगर येथील गुरुदत्त कॉलनीत राहण्यास आला होता.

लक्ष्मण पाटील हा त्याचा रुममेट होता. लक्ष्मणने सागरला खोलीत आल्या दिवसापासून सिगारेट ओढण्याची सक्ती करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने सागरच्या मागे तगादाच लावला. खरंतर सागरने लक्ष्मणला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला होता. मात्र लक्ष्मण ऐकतच नव्हता तू सिगारेट ओढ नाहीतर तुला ठार करेन अशी धमकीही लक्ष्मणने सागरला दिली. या सगळ्याचा ताण सहन न झाल्याने सागरने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -