रेल्वे रुळ ओलांडताना रुळामध्ये अडकली साडी अन्

Sari stuck in the rail line while crossing the railway track

झारखंडच्या पलामू जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. डाल्टनगंज रेल्वे स्थानकाच्या रेडमा ओव्हरब्रिजजवळ महिला रेल्वे लाईन ओलांडत होती, त्याच दरम्यान तिची साडी अचानक ट्रॅकमध्ये अडकली. साडी रेल्वे रुळात अडकल्यामुळे एका महिलेचा जीव गेला. घटना एवढी भीषण होती की वाचून धक्का बसेल.

एक महिला रेल्वे रुळ ओलांडत होती. त्याचवेळी तिची साडी रुळामध्ये अडकली. तेवढ्यात रेल्वे आली आणि महिलेला घेऊन गेली. या महिलेचा जागीच मृत्यू झाला. डाल्टनगंजच्या राज्य रेल्वे स्टेशन प्रभारी किशुन प्रसाद यांनी सांगितले की रेडमा ओव्हरब्रिजपासून थोड्या अंतरावर महिलेचा मृतदेह सापडला. सुरुवातीला तिची ओळख पटली नाही. काही वेळाने तिची ओळख पटली. सुशमा रवानी (वय ४२, रा. बेलाविका) प्रदीपकुमार यांची पत्नी असे या महिलेचे नाव आहे. तिचा नवरा आणि मुलगा तिला शोधत रेल्वेस्टेशनवर पोहोचले. त्यावेळी त्याने मृतदेहाची ओळख पटविली.

बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दोघे एकत्र गेले होते, असे या महिलेच्या नवऱ्याने सांगितले. दरम्यान, सुष्माने ती कुणालातरी भेटायला जायचे आहे असे सांगून दुसरीकडे गेली. बऱ्याच वेळापासून ती आली नाही तेव्हा तिला शोधायला लागले. प्रभाग २० चे नगरसेवक निरंजन प्रसाद म्हणाले की सुषमा रावणी ओरिएंट स्कूलमध्ये शिकवायची. ती शाळेच्या शिक्षकास भेटण्यासाठी रेडमा ओव्हरब्रिजमधून जात होती. दरम्यान तिची साडी रेल्वे रुळात अडकली. त्याचवेळी ट्रेन आली तेव्हा महिलेला तिच्याबरोबर ओढत नेले.