BMWवर लघुशंका केल्याने हटकले; म्हणून पेट्रोल टाकून जिवंत जाळले

बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करताना हटकले म्हणून सुरक्षारक्षकाला जाळण्याचा प्रयत्न केला.

security guard burned alive by rickshaw driver in pimpri chinchwad
BMWवर लघुशंका केल्याने हटकले; म्हणून पेट्रोल टाकून जिवंत जाळले

पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत असताना हटकलं म्हणून सुरक्षारक्षकाला रिक्षा चालकाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमध्ये सुरक्षारक्षक २० टक्के भाजला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना भोसरी एमआयडीसी परिसरात घडली आहे. शंकर भगवान वायफळकर (४१) असे जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून महेंद्र बाळू कदम (३१) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित घटना मंगळवारी दुपारी घडली असून रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; शंकर भगवान वायफळे हे सुरक्षारक्षक कंपनीच्या गेटवर कर्तव्य बजावत होते. तेव्हा आरोपी रिक्षाचालक महेंद्र बाळू कदम गेटजवळ कंपनी मालकाच्या बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत होता. त्यावेळी शंकर यांनी हटकलं आणि लघुशंका करण्यास मज्जाव केला. यावरुन त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि आरोपी कदम तिथून रिक्षा घेऊन निघून गेला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.

मात्र, रिक्षाचालक महेंद्र कदमच्या मनात शंकार यांच्याविषयी चीड निर्माण झाली होती. दरम्यान, साडे चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा येऊन त्यांनी बाटलीतून आणलेले पेट्रोल शंकर यांच्या अंगावर ओतून जिवंत जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शंकर गंभीर जखमी झाले असून त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी महेंद्र बाळू कदम याला पोलिसांनी अटक केली आहे.


हेही वाचा – भाजप-संघाच्या जीवावर निवडून येणारे इतरांना शिकवतायत; प्रसाद लाड यांचा खडसेंवर घणाघात