टोमणा मारला म्हणून नंदेच्या दोन वर्षाच्या मुलाची केली हत्या

प्रातिनिधिक फोटो

नंदेने टोमणा मारला म्हणून दोन भावजयांनी नंदेच्या दोन वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. ही घटना ग्रेटर नोएडा येथे घडली आहे. या प्रकरणी दोघींना अटक करण्यात आली आहे. नणंद आणि आणि भावजय यांच्यात वाद होतच असतात. मात्र, या वादावरुन लहान मुलाची हत्या होईल, हे धक्कादायक आहे.

काही दिवसांपूर्वी पतिच्या दोन बहिणी माहेरी आल्या होत्या. यावेळी नणंद सपना क्षुल्लक कारणांवरुन टोमणे मारायची. या टोमण्यांनी रागवलेल्या दोन्ही बहिणींनी नंदेला धडा शिकवण्यासाठी नंदेच्या दोन वर्षाच्या मुलाची हत्या केली. या प्रकरणी सूरजपुर पोलिसांनी पिंकी आणि रिंकी या दोन बहिणींना अटक केली आहे.

काय आहे घटना?

२९ सप्टेंबरला दुपारी सपना यांनी पोलीस स्थानकात तिचा दोन वर्षाचा मुलगा भव्यांश हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत तपास सुरु केला. रात्री उशीरा सपना यांची भावजय रिंकी यांच्या बेडरुममधील लाकडी कपाटात भव्यांशचा मृतदेह ब्लँकेटमध्ये लपेटलेला दिसला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालात भव्यांशचा मृत्यू दम घुटल्याने झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी रिंकीवर संशय घेत तिची चौकशी केली. या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली.