Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम जमिनीसाठी पोटच्या मुलानं बापाचे डोळे फोडले!

जमिनीसाठी पोटच्या मुलानं बापाचे डोळे फोडले!

वृद्ध वडिलांचा निर्दयी खुन करणाऱ्या मुलाला शोधण्यात पोलिसांना यश मिळाले.

Related Story

- Advertisement -

वडिलोपार्जित संपत्तीमुळे अनेक वेळा वाद होताता. बिहारमध्ये झालेला प्रकारही हैराण करणारा आहे. जमिनीच्या वादावरून मुलाने आपल्या वडिलांवर चाकूने हल्ल केला. हल्ला केल्यानंतर वडिलांचे चाकूने डोळे बाहेर काढले. वडिलांना जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोबराती असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते ७० वर्षांचे होते. बिहारच्या गोपालगंज येथे ही घटना घडली आहे.

सोबराती यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यातील एका मुलीच्या लग्नासाठी त्यांनी जमिन विकण्याच्या निर्णय घेतला. त्यांचा मुलगा बहारन याचा जमीन विकण्यासाठी विरोध होता. त्याने कुटुंबियाना या बाबत धमक्याही दिल्या होत्या. सोबराती यानी त्याच्या मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. या गोष्टीचा मुलाला प्रचंड राग आला. रागाच्या भरात मुलगा घराबाहेर निघून गेला. बुधवारी सकाळी अचानक मुलगा घरात आला. घरात घूसून मुलाने आपल्या वृद्ध वडिलांवर चाकूने हल्ला केला. चाकूने वडिलांच्या शरीरावर वार करून मुलाने आपल्या वडिलांचे डोळे बाहेर काढले.

- Advertisement -

डोळे बाहेर काढल्याने वडिल गंभीररित्या जखमी झाले. शेजाऱ्यांच्या मदतीने वडिलांना बिहारमधील गोपालगंजच्या रेफरल रूग्णालायात दाखल करण्यात आले. रूग्णालयात नेल्यानंतर वडिलांची प्रकृती आणखी गंभीर झाली. उपचारादरम्यान वृद्ध वडिलांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वृद्ध वडिलांवर चाकूने हल्ला केल्यानंतर मुलाने घरातून पळ काढला. गावातील लोकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो कोणाच्याही हाती लागला नाही. बायकोने आपल्या नवऱ्याच्या खुनाची पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली. आपल्या वृद्ध वडिलांचा निर्दयी खुन करणाऱ्या मुलाला शोधण्यात पोलिसांना यश मिळाले.

- Advertisement -

मृत व्यक्तीच्या बायकोने दिलेल्या माहितीनुसार, या आधीही मुलाने आपल्या वृद्ध आई वडिलांना घराच्या बाहेर काढले होते. दोघे वृद्ध जोडपे गावाजवळ एका झोपडीत राहून आपले आयुष्य जगत होते. आपल्या दोन मुलींची लग्न करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी त्यांनी आपली जमिन विकण्याच्या निर्णय घेतला होता.


हेही वाचा – धक्कादायक! मृतदेहावर खुर्ची टाकून नवरा सांगू लागला बायकोच्या हत्येची कहाणी

 

 

- Advertisement -